उभा कसा राहीला विटेवरी लिरिक्स (Ubha Kasa Rahila Vitewari Lyrics in Hindi) -


विठ्ठल विठ्ठल म्हणतील सगळे.

विठूराय कितीसे दूर.

इमानदारांच्या समीप अन्..

बैमानापासून दूर.


पंढरीचा विठ्ठल कूणी पाहीला.

उभा कसा राहीला विटेवरी..||धृ.||


अंगी शोभे पितांबर पिवळा.

गळ्यामध्ये वैजयंती माळा..

चंदनाचा टिळा माथी शोभला

उभा कसा राहीला विटेवरी||1||


चला चला पंढरीला जाऊ.

डोळे भरूनी विठू माऊलीला पाहू.

भक्ती मार्ग आम्हाला त्याने दाविला.

उभा कसा राहीला विटेवरी..||2||


ठेवूनिया दोन्ही करकटी.

उभा हा मुकूंद वाळवंटी..

हरिनामाचा झेंडा तिथे रोविला.

उभा कसा राहीला विटेवरी..||3||


बाळ श्रावण प्रार्थी आता.

नका दूर लोटू पंढरीनाथा.

तव चरणी हा देह सारा वाहिला

उभा कसा राहीला विटेवरी..||4||


पंढरीचा विठ्ठल कूणी पाहीला.

उभा कसा राहीला विटेवरी


*** Singer :- Priyanka Karanje ***


Also Read Krishna Bhajan:-