रडते माझे बाळ तान्हे गौळण लिरिक्स (Radate Majhe Bal Tanhe Gavlan Lyrics in Hindi) - 


रडते माझे बाळ तान्हे 

समजाविता राहीना 


नानापरी समजाविते

मागील ते खाया देते.

भाप डोळे निजविते

तरी हा उगा राहीना

रडते माझे बाळ तान्हे...

  

नानापरी करितो छंद 

रडतो हा कुज कुज  

नेत्रावाटे वाहे बुंद

रडता हा राहीना

रडते माझे बाळ तान्हे...


बोटी धरुनिया दम

सर्वाअंगी सुटला घाम

एका जनार्दने प्रेम

 यशोदेसी माईना

रडते माझे बाळ तान्हे...


रडते माझे बाळ तान्हे 

समजाविता राहीना ||