राधा बावरी (Radha Bawri Lyrics in Hindi) -
Song: Radha BawriLyrics & Composer M.S. MoyalMusic: Shallu SoniVideo: Category: Radha Krishna Bhajan (Haryanvi)Producers: Amresh Bahadur, Ramit MathurLabel: Yuki
राधा ही बावरी लिरिक्स (Radha Hi Bawari Lyrics in Hindi) -
रंगात रंग तो श्यामरंग पाहण्या नजर भिरभिरते
ऐकुन तान विसरून भान ही वाट कुणाची बघते
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
हिरव्या हिरव्या झाडांची पिवळी पाने झुलताना
चिंब चिंब देहावरुनी श्रावणधारा झरताना
हा दरवळणारा गंध मातीचा मनात बिलगून जाई
हा उनाड वारा गूज प्रीतीचे कानी सांगून जाई
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
आज इथे या तरूतळी सूर वेणूचे खुणावती
तुज सामोरी जाताना उगा पाऊले घुटमळती
हे स्वप्न असे की सत्य म्हणावे राधा हरखून जाई
हा चंद्र चांदणे ढगा आडुनी प्रेम तयांचे पाही
त्या सप्तसुरांच्या लाटेवरूनी साद ऐकुनी होई
राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks