बाजाराला विकण्या निघाली लिरिक्स || Baazaaraala vikenya nighalee lyrics in hindi ||
बाजाराला विकण्या निघाली,
दही दूध ताक आणि लोणी,
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी
गोकुळच्या त्या गाई म्हशीचं,
खाणं सगळं राण मालाचं,
उगीच कशाला चाखून बघायचं,
पैशा विणा घेणं,
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी
यमुनेचा तो अवघड घाट,
चढता चढता दुःखतिया पाट,
नेहमीच तयाची वारी कट,
थांबू नका गवलणी,
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी
महानंदाची वेडी माया,
देवासाठी तिची सुखली काया,
एका जनार्दनी पडू त्याच्या पाया,
देवा लीन होवूनी,
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी
बाजाराला विकण्या निघाली,
दही दूध ताक आणि लोणी,
बाई माझ्या गं दुधात नाही पाणी