विठ्ठल आवडी प्रेमभावो  लिरिक्स (Vitthal avadee premabhaavo Lyrics in Hindi) - 


विठ्ठल आवडी प्रेमभावो

विठ्ठल नामाचा रे टाहो


विठ्ठल आवडी प्रेमभावो ।

विठ्ठल नामाचा रे टाहो ॥

तुटला हा संदेहो ।

भवमूळ व्याधीचा ॥

विठ्ठल आवडी प्रेमभावो


म्हणा नरहरी उच्चार ।

कृष्ण हरी श्रीधर ।

हेची नाम आम्हा सार ।

संसार करावया प्रेमभावो ॥

विठ्ठल आवडी प्रेमभावो


नेणो नामाविण काही ।

विठ्ठल कृष्ण लवलाही ।

नामा म्हणे तरलो पाही ।

विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥

विठ्ठल आवडी प्रेमभावो



*** Singer : Suresh Wadkar ***