नाम तुझे घेता देवा होई समाधान लिरिक्स (Naam Tujhe Gheta Dewa Hoyi Samadhan Lyrics in Hindi) -
नाम तुझे घेता देवा होई समाधान
तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
सूत्रधार तू विश्वाचा तुझे गूढ़ ज्ञान
कल्गातिचे फिरविशी चक्र ते महान
मिळे मोक्ष तुझिया नामे देशी ऐसे दान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
काम क्रोध माया भुलवी मन धाव घेई
आशा निराशेचे फेरे जगी ठायीठायी
आहे तुज अंतर्ज्ञानी तुला सर्व जाण
नाम तुझे घेता देवा होई समाधान
बंधू माय बापा लागे आस दर्शनाची
दत्ता मन्हे ऐका नाथा हाक पामराशी
अल्प बुद्धि माझी देवा भक्त मी रे सान
नाम तुझे घेता देवा होई समाधान ||
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks