मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान लिरिक्स (Magto Mi Panduranga Fakt Ek Daan Lyrics in Hindi) -
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
बालपणी होते माझे मन हे अजाण
तरुणपणी संसारातगेले सर्व ध्यान
गेले सर्व ध्यान वृद्धपण येता आली जागती महान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
पतितांना पावन करते दया तुझी थोर,
भीक मागतो मी चरणी, अपराधी घो...र,
अपराधी घो...र क्षमा करी बा विठ्ठला
अंगी नाही त्राण मिळे ज्याने
मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान,
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान
मिळे ज्याने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान ||