जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स - Jagnyache Deva Labho Aise Bad Lyrics in Hindi) -
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
दुर्गुणाचा वळ पहावेना
सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ
मरणाची झळ साहावेना
तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ
उन्मादाचा मळ झाकवेना..
विठ्ठलाची आस वाढावी सरळ
विषाचे करळ टाकावेना..
जगण्याचे देवा .....
ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान
चरणात ध्यान राहुदेगा..
अमृताची वेल अमृताचा देह
भक्तीचा मृदुंग वाजुदेगा..
विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग
मन झाले दंग माऊलीचे..
घडो तुझी प्रीत वाढो तूझा संग
जीवनाचा रंग पाहुदेगा..
विठ्ठल...विठ्ठल...विठ्ठल
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks