देवा तू सांग ना कुठ गेला हरवुनी लिरिक्स (Deva Tu Sang Naa Kuth Gela Harauni Lyrics in Hindi) - Marathi Bhajan - Bhaktilok


हे देवा तू सांग ना कुठ

गेला हरवुनी

लेकराची आन तुला

आवतर आता तरी


अंधारल्या दाही दिश्या

अन बेजारल मन

उर जळून निघाल

बघ करपल मन


आता तरी बघ देवा

उंबऱ्यात मी उभा

रीत तुझ्या दावन्याल

माझा काय र गुन्हा


उरा मंधि जाळ पेटला

जन्माची राख झाली रं

ईस्कटलेली दिशा ही

धुरामंदी वाट गेली र


जिनी धुळीवाणी झालं

नेल्ह वार्‍याने उडून

अवकाळी वादळत

जीव लपेटून गेलं


आता तरी बघ देवा

उंबऱ्यात मी उभा

रित तुझ्या दावन्याल

माझा  काय र गुन्हा


काळजावर घाव घातला

जिवारी गेला तडा र

निखार्याची वाट दिली तू

पायतान न्हायी पाई र


कुठं ठेऊ मी र माथा

दैव झाला माझा खुळा

असं कसं माय बाप

तू र बेफिकिरी झाला


आता तरी बघ देवा

उंबऱ्यात मी उभा

रित तुझ्या दावन्याल

काय र गुन्हा


हे देवा तू सांगणं

कुठ गेला हरवुनी

लेकरची आन तुला

आवतर आत तरी


अंधाराल्य दाही दिश्या

आन बेजराल मन

उर जाळून निघालं

बघ करपल मन


आता तरी बघ देवा

उंबऱ्यात मी उभा

रित तुझ्या दावन्याल

माझाकाय र गुन्हा ||