कानडा राजा पंढरीचा लिरिक्स (kanaada raaja pandhareecha Lyrics in Hindi) - 


कानडा राजा पंढरीचावेदांनाही 

नाही कळला अंतपार याचा


निराकार तो निर्गुण ईश्वर

असा प्रकटला असा विटेवर

उभय ठेविले हात कटीवर

पुतळा चैतन्याचा ||


परब्रम्ह हे भक्तासाठी

उभे ठाकले भीमेकाठी

उभा राहिला भाव सावयव

जणु कि पुंडलिकाचा ||


हा नाम्याची खीर चाखतो

चोखोबांची गुरे राखतो

पुरंदराचा हा परमात्मा

वाली दामाजीचा ||


***Singer - Dr. Vasantrao Deshpande***