अमृताहुनी गोड नाम तुझे देवा लिरिक्स (Amrutahuni God Naam Tuze Deva Lyrics in Hindi) - 


अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ।

मन माझे केशवा का बा न घे ॥१॥

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ||


सांग पंढरीराया काय करु यांसी ।

का रूप ध्यानासी न ये तुझे ॥२॥

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ||


किर्तनी बैसता निद्रे नागविले ।

मन माझे गुंतले विषयसुखा ॥३॥

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ||


हरिदास गर्जती हरिनामाच्या किर्ती ।

नये माझ्या चित्ती नामा म्हणे ॥४॥

अमृताहुनी गोड नाम तुझे देवा ||