चांदण चांदण झाली रात एकविरीची पाहत होते वाट भजन इन हिंदी लिरिक्स 


चांदण चांदण झाली रात 

एकविरीची पाहत होते वाट.....||


पुण्याचा सोनार बोलवा ग 

आईला नथनि घडावा ग 

हळदी ग कुंकवाच घेऊन ताट 

एकविरीची पाहत होते वाट 

चांदण चांदण झाली रात 

एकविरीची पाहत होते वाट.....||


ठाण्याचा कासार बोलवा ग 

आईला बांगड्या भरा ग 

लिंब ग नारळाच घेऊन ताट 

एकविरीची पाहत होते वाट 

चांदण चांदण झाली रात 

एकविरीची पाहत होते वाट.....||


रायगड चा लोहार बोलवा ग 

आईला त्रिशूल घडावा ग 

उदो ग कोंबड्याच घेऊन ताट 

एकविरीची पाहत होते वाट 

चांदण चांदण झाली रात 

एकविरीची पाहत होते वाट.....!!