दर्शन दे रे दे रे भगवंता लिरिक्स (Darshan De Re De Re Bhagwanta Lyrics in Hindi) -
दर्शन दे रे, दे रे भगवंता
किती अंत आता पहाशी अनंता
दर्शन दे रे.....
माय पित्याची सेवा पुंडलिकाची
भक्ती पाहिली तू गोर्याकुंभाराची
तैसे येणे व्हावे तुझे कृपावंता
दर्शन दे रे.....
ऐकताच वाणी संत चोखोबाची
साक्षात प्रगटे मूर्ती विठ्ठलाची
ऐसे दान देशी तुझ्या प्रिय संता
दर्शन दे रे.....
तूच जन्मदेता, तूच विश्वकर्ता
मन शांत होई, तुझे गुण गाता
हिच एक आशा, पुरवी तू आता
दर्शन दे रे.....||
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks