कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची लिरिक्स (Kadhi Lagel Re vedya Tula Godi Abhanga Chi Lyrics in Hindi) -
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
बघुन घे साऊली मुर्ती आता त्या पांडुरंगाची
तुझा ना भरोसा आ... आ... आ...
न माझा भरोसा
जग हे कोणाचे सांग भल्या माणसा
असो चुल माती आणि मीठ भाकर
नाम हरीचे मुखी गोड साखर
सोडून दे रे धनाच्या तु लालसा
जग हे कोणाचे सांग भल्या माणसा ||
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची
बघुन घे साऊली मुर्ती आता त्या पांडुरंगाची || धृ ||
मनोभावे भजन कर तु प्रभुच्या लाग चरणाला
करून घे भक्तीने शुद्धी तुझ्या त्या अंतरंगाची
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची || १ ||
असे हा जन्ममोलाचा नको तु घालवू वाया
हे सदा गारे भुपाळी तु सकाळी त्या श्रीरंगाची
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची || २ ||
धनाचा लोभ सोडून दे धरी सन्मार्ग नेकीचा
जपून तु चाल रे वेड्या तुटेल ही दोर पतंगाची
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची || ३ ||
मिळावी मुक्ती म्हणुनी भक्ती कर
भटकू नको जगभर तू वेड्या
तुला जाणीव रे होईल
आलेया घोर प्रसंगाची
कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची || ४ ||
|| आषाढी एकादशी च्या सर्वाना हार्दिक शुभेच्छा ||
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks