वाकून टाक सडा गं राधे जरा गवळण लिरिक्स (Wakun Taak Sada G Radhe Jara gavlan Lyrics in Hindi) -
वाकून टाक सडागं राधे जरा
वाकून टाक सडा ।। धृ ।।
केस कुरळे उडतील भुरूभुरू
आवळून बांध जुड़ा गं राधे जरा
वाकून टाक सडा ।।१।।
शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील
पदर खोच कमरेला गं राधे जरा
वाकून टाक सडा ।।२।।
गावातील लोक टकमक बघतील
थुंकून टाक विडा गं राधे जरा
वाकून टाक सडा ।।३।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने
श्रीरंग माझा वेडा गं राधे जरा
वाकून टाक सडा ।।४।।
*** Singer: Surykant Shinde ***
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks