मंगलाष्टक संपूर्ण मराठी लिरिक्स (Mangalashtak Lyrics In Marathi) - Sampurna Mangalashtake - Bhaktilok

Deepak Kumar Bind

 

मंगलाष्टक संपूर्ण मराठी लिरिक्स (Mangalashtak Lyrics In Marathi) - Sampurna Mangalashtake - 

मंगलाष्टक संपूर्ण मराठी (Mangalashtak Lyrics In Marathi) - Sampurna Mangalashtake - Bhaktilok

मंगलाष्टक संपूर्ण मराठी लिरिक्स (Mangalashtak Sampurn Lyrics in Marathi):-


Song - Sampurna  Mangalashtake | संपूर्ण मंगलाष्टका 

Singer - Arjun Patil 

Music -  Arjun Patil 

ALbam - Mangalashtke 

Lebal - Naina music 


हिंदूंमध्ये माता (Hindumadhye Mata):-

पित्यांच्या संमतीने होत असलेल्या धार्मिक पद्धतीच्या विवाहाप्रसंगी म्हटल्या जाणार्‍या पद्य रचनांना मंगलाष्टक असे म्हणतात. मंगलाष्टकाची प्रथा विशेषकरून महाराष्ट्रीय समाजात प्रचलित आहे. विवाह समारंभात वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करून त्यांना आशीर्वाद देण्याच्या प्रथेचा हा एक भाग आहे.||

मंगलाष्टकांचे मूळ विवाहप्रसंगी ज्येष्ठांनी वधूवरांना त्यांच्या दांपत्यजीवनासाठी द्यावयाच्या आशीर्वचनात आहे. पारंपरिकरीत्या मंगलाष्टक ही आठ ओळींचा चरण असलेली, विशिष्ट सुरांत म्हणण्याची पद्यरचना असते. तिचा एक चरण संपल्यानंतर जमलेली मंडळी वधूवरांवर फुले आणि अक्षतांचा वर्षाव करतात. ही पद्यरचना मराठी किंवा संस्कृतमध्ये असते. मात्र विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून मंगलाष्टके स्वरचित म्हणण्याचा परिपाठही वधू वराचे नातेवाईक आणि निकटवर्तीयांनी सुरू केला आहे. वधू आणि वराला त्यांच्या दांपत्यजीवनासाठी शुभेच्छा आणि आशीर्वाद हा या रचनांचा मुख्य गाभा मात्र टिकून आहे.


मंगलाष्टक संपूर्ण मराठी लिरिक्स (Mangalashtak Lyrics In Marathi) -


स्वस्ति श्री गणनायकं 

गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं 

बल्लाळो मुरुडं विनायकमहं 

विनायकमहं चिन्तामणि स्थेवरं

लेण्याद्रिं गिरिजात्मकं 

सुरवरदं विघ्नेश्वरम् ओज़रम्

ग्रामे रांजण संस्थितम् 

गणपतिः कुर्यात् सदा मङ्गलं


गंगा सिंधु सरस्वती च 

यमुना गोदावरी नर्मदा

कावेरी शरयू महेंद्रतनया 

शर्मण्वती वेदिका

क्षिप्रा वेत्रवती महासुर 

नदी ख्याता गया गंडकी

पूर्णा पूर्ण जलैः समुद्र 

सरिता कुर्यातसदा मंगलम


राजा भीमक रुख्मिणीस

 नयनी देखोनी चिंता करी

ही कन्या सगुणा वरा 

नृपवरा कवणासि म्यां देईजे

आतां एक विचार कृष्ण 

नवरा त्यासी समर्पू म्हणे

रुख्मी पुत्र वडील त्यासि 

पुसणे कुर्यात सदा मंगलम


लाभो संतति संपदा बहु 

तुम्हां लाभोतही सद्गुण

साधोनि स्थिर कर्मयोग 

अपुल्या व्हा बांधवां भूषण

सारे राष्ट्र्धुरीण हेचि 

कथिती कीर्ती करा उज्ज्वल

गा गार्हस्थाश्रम हा तुम्हां 

वधुवऱां देवो सदा मंगलम


आली लग्नघडी समीप 

नवरा घेऊनि यावा घरा

गृह्योत्के मधुपर्कपूजन 

करा अन्तःपटाते धारा

दृष्टादृष्ट वधुवरा न 

करितां दोघे करावी उभी

वाजंत्रे बहु गलबला न 

करणे लक्ष्मीपते मंगलम





Post a Comment

0Comments

If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !