ज्ञानाचा सागर लिरिक्स (Gyanacha Sagar Lyrics in Hindi) - 


ज्ञानाचा सागर । 

सखा माझा ज्ञानेश्वर ॥१॥ 

ज्ञानाचा सागर.....


मरोनियां जावें । 

बा माझ्याच्या पोटा यावें ॥२॥

ज्ञानाचा सागर.....


ऐसें करी माझ्या भावा । 

सख्या माझ्या ज्ञानदेवा ॥३॥

ज्ञानाचा सागर.....


जावें वोवाळुनी । 

जन्मोजन्मीं दासी जनी ॥४॥

ज्ञानाचा सागर.....