संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा लिरिक्स (Sampurna Jagala Tujha Rupacha Rang Dila Deva Lyrics in Hindi) -
संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा
फुलफुलातून देतो संदेश तु आम्हाला देवा
जगावे लोकांसाठी हा देश तुझा देवा
माणुसकीचा मंत्र दिला प्रेमाचा पावन कंठ दिला तू
दिला आम्हाला तू फुलराजा धन्य झालो देवा
संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा ||
जन्म लाभला आलो जगी दिला फुलांचा झुला
मार्गी मोक्षाच्या जरी निघालो जात तुझी रे फुला
या मातीला आकार दिला शिल्पकार तू खरा
तुझा मुखी हे शब्द गवसले गीतकारतु खरा
ऋणी तुझे आम्ही फुलराजा धन्य झालो देवा
संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा ||
मन सुंदर सुंदर जसा मोगरा सदाफुलीचा साज नाचरा
ही जाईजुई वारयांशी डोले रातराणी तरयांशी बोले
शेवंतीने स्वप्न सजवुया झेंडू संगे भक्तीत रमुया
हे कमळा सम निस्वार्थ बनुया गुलाब क्षीचे पार्थ बनुया
परिजातची संधी जाते सोनचफा बोली नाचे
या भूमीवर देवांचा तारा अभिमानाने अवतरला
सर्वधर्माचा तुच लाडका भेदभाव ना तुला
हे ऋणी तुझे आम्ही फुलराजा धन्य धन्य देवा ||
संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा
फुलफुलातून देतो संदेश तु आम्हाला देवा
जगावे लोकांसाठी हा देश तुझा देवा
माणुसकीचा मंत्र दिला प्रेमाचा पावन कंठ दिला तू
दिला आम्हाला तू फुलराजा धन्य झालो देवा
संपूर्ण जगाला तुझ्या रूपाचा रंग दिला देवा
जगण्याला प्रेमाच्या तुझ्या सुगंध दिला देवा ||
*** Singer - Ajay Gogavale ***
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks