विठू माउली तू माउली जगाची लिरिक्स (Vithu Mauli Tu Mauli Jagachi Lyrics in Hindi) -
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची
विठ्ठला मायबापा
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची
काय तुझी माया सांगू श्रीरंगा
संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा
डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलिया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळ चिपळ्यांची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची.....
लेकरांची सेवा केलीस तू आई-२
कस पांग फेडू कस होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड न्हाई
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाउलांची
विठ्ठला मायबापा
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची
पांडुरंग पांडुरंग विठू माउली तू
विठू माउली तू माउली जगाची
माउलीत मूर्ती विठ्ठलाची ||
*** Singer - Sudhir Phadke | Suresh Wadkar ***
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks