मराठी भजन गीत (Marathi bhajan lyrics in Hindi) -
अवघे गर्जे पंढरपूर लिरिक्स (Awaghe Garje Pandharpur Lyrics in Hindi) -
अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाचा गजर
हे अवघे गर्जे पंढरपूर अवघे
टाळघोष कानी येती
ध्यानी विठ्ठलाची मूर्ती
पांडुरंगी नाहले हो
चंद्रभागा नीर
अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाचा गजर
हे अवघे गर्जे पंढरपूर . . .
इडापिडा टळुनि जाती
देहाला या लाभे मुक्ती
नामरंगी रंगले हो
संतांचे माहेर
अवघे गर्जे पंढरपूर
चालला नामाचा गजर
हे अवघे गर्जे पंढरपूर अवघे . . .
देव दिसे ठाई ठाई भक्त ली
2: माझे माहेर पंढरी लिरिक्स (Majhe Maher Pandhari Lyrics in Hindi) -
माझे माहेर पंढरी ।
आहे भीवरेच्या तीरी ॥१॥
बाप आणि आई ।
माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
पुंडलीक राहे बंधू ।
त्याची ख्याती काय सांगू ॥३॥
माझी बहीण चंद्रभागा ।
करितसे पाप भंगा ॥४॥
एका जनार्दनी शरण ।
करी माहेरची आठवण ॥
3: देव आपुले अंतरी लिरिक्स (Dev Aplulya Antari Tukdoji Lyrics in Hindi) -
देव आपुले अंतरी
देव आपुले अंतरीं।
आम्ही जातो तीर्थावरी ॥
देव आम्हासी पाहतो।
आम्ही धोंडोबा पूजतो ॥
देव आम्ही प्रकाशितो ।
आम्ही अंधारी राहतो।
तुकड्या म्हणे कैसे जुळे?।
जोवर अज्ञान ना टळे।।
4: कानडा राजा पंढरीचा लिरिक्स (kanaada raaja pandhareecha Lyrics in Hindi) -
कानडा राजा पंढरीचावेदांनाही
नाही कळला अंतपार याचा
निराकार तो निर्गुण ईश्वर
असा प्रकटला असा विटेवर
उभय ठेविले हात कटीवर
पुतळा चैतन्याचा ||
परब्रम्ह हे भक्तासाठी
उभे ठाकले भीमेकाठी
उभा राहिला भाव सावयव
जणु कि पुंडलिकाचा ||
हा नाम्याची खीर चाखतो
चोखोबांची गुरे राखतो
पुरंदराचा हा परमात्मा
वाली दामाजीचा ||
5: सुंदर ते ध्यान उभे विटेवरी लिरिक्स (sundar te dhyaan ubhe vitepuree Lyrics in Hindi) -
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी||
तुळसीहार गळा कासे पितांबर
आवडे निरंतर हेची ध्यान
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी||
मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभ मणी विराजित
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी||
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख
पाहीन श्रीमुख आवडीने
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
कर कटावरी ठेवोनिया
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी ||
6:हेंचि दान देगा देवा लिरिक्स (Henchee daange deva Lyrics in Hindi) -
हेंचि दान देगा देवा ।तुझा विसर न व्हावा ॥
गुण गाईन आवडी ।
हेचि माझी सर्व जोडी ॥२॥तुझा विसर न व्हावा…..||
न लगे मुक्ति आणि संपदा ।
संतसंग देई सदा ॥३॥तुझा विसर न व्हावा…..||
तुका ह्मणे गर्भवासी ।
सुखें घालावें आह्मांसी ॥४॥तुझा विसर न व्हावा…..||
वाचे विठ्ठल गाईन लिरिक्स (vaache vinaathal gen Lyrics in Hindi) -
वाचे विठ्ठल गाई
नाचत नाचत पंढरी जाईन…॥
वाचे विठ्ठल गाईन …
ऐसे आहे माझ्या मनी
लोळेन संतांच्या रजकणी…॥
वाचे विठ्ठल गाईन …
रंग लावीन अंतरंगी
भरूनी देहभाव सारा…॥
वाचे विठ्ठल गाईन ………..
तुकड्या म्हणे होईन मी दास
देवा पुरवा ईतूकी आस…॥
वाचे विठ्ठल गाईन .
8: विठ्ठल आवडी प्रेमभावो लिरिक्स (Vitthal avadee premabhaavo Lyrics in Hindi) -
विठ्ठल आवडी प्रेमभावो
विठ्ठल नामाचा रे टाहो
विठ्ठल आवडी प्रेमभावो ।
विठ्ठल नामाचा रे टाहो ॥
तुटला हा संदेहो ।
भवमूळ व्याधीचा ॥
विठ्ठल आवडी प्रेमभावो
म्हणा नरहरी उच्चार ।
कृष्ण हरी श्रीधर ।
हेची नाम आम्हा सार ।
संसार करावया प्रेमभावो ॥
विठ्ठल आवडी प्रेमभावो
नेणो नामाविण काही ।
विठ्ठल कृष्ण लवलाही ।
नामा म्हणे तरलो पाही ।
विठ्ठल विठ्ठल म्हणताची ॥
विठ्ठल आवडी प्रेमभावो
9:चल ग सखे चल ग सखे पंढरीला लिरिक्स (chal ga sakhe chal ga sakhe pandharila Lyrics in Hindi) -
पुंडलिकवर्देवं हरी विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल|
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल||
तू ध्यानी जरा ठेव हो हो हो
तू ध्यानी जरा जिथे भाव तिथे देव
चल भेटू विठ्ठल रखुमाईला
चल ग सखे चल ग सखे पंढरीला
जय हरी विठ्ठल||
चंद्रभागा नदीतीरावर
विठ्ठल विठ्ठल
मंदिर विठ्ठलाचे सुंदर
विठ्ठल विठ्ठल ||
10:-जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ लिरिक्स (jaganyaache deva laabho aise bal Lyrics in Hindi) -
जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
दुर्गुणाचा वळ पहावेना
सदगुणांची देवा वाढो ऐसी कळ
मरणाची झळ साहावेना
तुझ्या दारी दावी पांडुरंगी तळ
उन्मादाचा मळ झाकवेना..
विठ्ठलाची आस वाढावी सरळ
विषाचे करळ टाकावेना..
जगण्याचे देवा …..
ऐसे लाभो भान देगा देवा ज्ञान
चरणात ध्यान राहुदेगा..
अमृताची वेल अमृताचा देह
भक्तीचा मृदुंग वाजुदेगा..
विठु तुझ्या दारी भेटला श्रीरंग
मन झाले दंग माऊलीचे..
घडो तुझी प्
11:नाम तुझे रे नारायणा अभंग लिरिक्स (Naam re naaraayana abhang Lyrics in Hindi) -
नाम तुझे रे नाम तुझे रे
नाम तुझे रे नारायणा
फोड़ी पाषाणाला पान्हा
नाम तुझे रे नारायणा।।
नाम तुझे रे नारायणा
नाम जपले वाल्मिकाने
फुटले दोन त्याला पाने ।।
नाम तुझे रे नारायणा
आला मेला पापरासी
तोही गेला देवा वैकुंठाशी।।
नाम तुझे रे नारायणा
ऎसा नामाचा महिमा
तुका म्हणे झाली सीमा ।।
नाम तुझे रे नारायणा
12:नाम तुझे घेता देवा होई समाधान लिरिक्स (naam tera gheta deva hoee samaadhaan Lyrics in Hindi) -
नाम तुझे घेता देवा होई समाधान
तुझ्या पदी लागो माझे तन मन ध्यान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
सूत्रधार तू विश्वाचा तुझे गूढ़ ज्ञान
कल्गातिचे फिरविशी चक्र ते महान
मिळे मोक्ष तुझिया नामे देशी ऐसे दान
नाम तुझे घेता देवा होई समाधान
काम क्रोध माया भुलवी मन धाव घेई
आशा निराशेचे फेरे जगी ठायीठायी
आहे तुज अंतर्ज्ञानी तुला सर्व जाण
नाम तुझे घेता देवा होई समाधान
बंधू माय बापा लागे आ
13:देवा तुझ्या नावाचं र येड लागल लिरिक्स (Deva tooya navaachan ra yed laagal Lyrics in Hindi) -
जिथ तिथ रूप तुझं दिसू लागल
देवा तुझ्या नावाचं र येड लागल
येड लागल येड लागल…..
चंद्र सूर्य डोळ तुझं
आभाळ हे बाळ तुझं
झुलू झुलू पाणी जणू
खुलू खुलू चाळ तुझं
तुझ्याईना संसार यो
कडूझार सारा
नाव तुझं घेतलनि गोड लागल
देवा तुझ्या नावाचं र येड लागल
येड लागल येड लागल…..
14 : डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे लिरिक्स (Dagamag dole maajhee panya vaaree naav re Lyrics in Hindi) -
तुला पाहन्यासी देवा जीव हा भूकेला
धीर नही वाटे देवा माझ्या मनला
काय सांगू आता देवा दूर तुझे गाव रे
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे
डगमग डोले माझी पान्या वारी नाव रे
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे
तुझ्या चरनासी वाहे भीमा चंद्रभागा
नही देव पावलो मी झालो अभागा
आता तरी देवा माला एक वेळा पाव रे
पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे
डगमग डोले माझी पान्या वारी नाव
15:गोड तुझे रूप गोड तुझे नाम (Bhagavaan ka roop bhagavaan ka naam Lyrics in Hindi) -
देई मज प्रेम सर्वकाळ
गोड तुझे रूप गोड तुझे नाम ||
सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती
रखुमाई चा पती सोयरिया ||
गोड तुझे रूप…
विठू माऊली हाचि वर देई
संचारुनी येई हृदयी माझ्या ||
गोड तुझे रूप…
तुका म्हणे काही न मागे आणिक
तुझे पायी सुख सर्व आहे
गोड तुझे रूप…
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks