येई येई विठ्ठल माझे माउली आरती लिरिक्स (Yeyi Yeyi Vitthal Majhe Mauli Aarti Lyrics in Hindi) -
येई येई विठ्ठल माझे माउली
विठ्ठले माझे माउली
निढळावरी कर
निढळावरी कर
ठेवुनि वाट मी पाहें
येई येई विठ्ठल....
आलिया गेलिया हातीं
धाडी निरोप
हातीं धाडी निरोप
पंढरपुरीं आहे
पंढरपुरीं आहे
माझा मायबाप
पिवळा पीतांबर कैसा
गगनीं झळकला
कैसा गगनीं झळकला
गरुडावरि बैसोनि
गरुडावरि बैसोनि
माझा कैवारी आला
विठोबाचे राज्य आम्हां
नित्य दिपवाळी
आम्हां नित्य दिपवाळी
विष्णुदास नामा जीवें
विष्णुदास नामा
जीवें भावें ओंवाळी
येई येई विठ्ठल माझे माउली
विठ्ठले माझे माउली
निढळावरी कर
निढळावरी कर
ठेवुनि वाट मी पाहें
येई येई विठ्ठल....||
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks