गणराया लवकर येई भेटी सकळांसी देई लिरिक्स (Ganaraya Lavakar Yeyi Lyrics in Hindi) -
गणराया लवकर येई ।
भेटी सकळांसी देई ॥१॥
गणराया लवकर येई.....||
अंगी शेंदुराची उटी ।
केशर कस्तुरी लल्लाटी ॥2॥
गणराया लवकर येई.....||
पायी घागुऱ्या वाजती।
नाचत आले गणपती ॥3॥
गणराया लवकर येई.....||
अवघ्या गणाचा गणपती ।
हाती मोदकाची वाटी ॥4॥
गणराया लवकर येई.....||
तुका म्हणे शोधून पाहे ।
विठ्ठल गणपती दुजा नोहे ॥5॥
गणराया लवकर येई.....||
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks