विठ्ठला तू वेडा कुंभार लिरिक्स (Vitthala Tu Veda Kumbhar Lyrics in Hindi) - Marathi Bhajan - Bhaktilok

Deepak Kumar Bind

 

विठ्ठला तू वेडा कुंभार लिरिक्स (Vitthala Tu Veda Kumbhar Lyrics in Hindi) - 


फिरत्या चाकावरती 

देसी मातीला आकार

विठ्ठला तू वेडा कुंभार !


माती पाणी उजेड वारा

तूच मिसळसी सर्व पसारा

आभाळच मग ये आकारा

तुझ्या घटांच्या उतरंडीला 

नसे अंत ना पार !

विठ्ठला तू वेडा कुंभार  


घटाघटांचे रूप आगळे

प्रत्येकाचे दैव वेगळे

तुझ्याविना ते कोणा नकळे

मुखी कुणाच्या पडते लोणी 

कुणा मुखी अंगार !

विठ्ठला तू वेडा कुंभार  


तूच घडविसी तूच फोडिसी

कुरवाळिसि तू तूच ताडिसी

न कळे यातुन काय जोडिसी?

देसी डोळे परि निर्मिसी 

तयांपुढे अंधार !

विठ्ठला तू वेडा कुंभार ||


Post a Comment

0Comments

If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks

Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Accept !