तूच सुखाचा हाय ठेवा माझ्या गणपती देवा लिरिक्स (Tuch Sukhacha Hai Thewa Majhya Ganapati Deva Lyrics in Hindi) -
मंगलमूर्ती मोरया
मोरया रे बाप्पा मोरया रे
मोरया रे बाप्पा मोरया रे
तुझ्या नामात हाय गोडवा
तूच सुखाचा हाय ठेवा
माझ्या गणपती देवा
तूच सुखाचा हाय ठेवा
माझ्या गणपती देवा ||
ढोल ताशाच्या ठेक्या वरती
भक्त झाले हो सारे धुंद
आली घराला मंगलमूर्त
आज आनंदी हो आनंद
माझ्या देवांन माझ्या गणान
पितांबर ल्याले नवा
तूच सुखाचा हाय ठेवा
माझ्या गणपती देवा ||
ते सुरवर मुनिवर गाती
देवा अथांग तुझी ही कीर्ती
तू देवाचा देव गणपती
करी मनोकामना पूर्ती
माझ्या गणाच माझ्या देवाच
मंगलमय रूप पहावा
तूच सुखाचा हाय ठेवा
माझ्या गणपती देवा ||
हिरे जडीत मुकुट डोई
वाजे रुणझुण घुंगुरू पायी
संगे पुजली ती गौराई
काय सांगू तिची नवलाई
महती लिहायला महती लिहायला
त्या कैलासाला बोलवा
तूच सुखाचा हाय ठेवा
माझ्या गणपती देवा |
*** Singer - Kavya Bhoir ***
If you liked this post please do not forget to leave a comment. Thanks